breaking-newsक्रिडा

सुहित लंका, मोहित बेंद्रे, गायत्री बाला, आकांक्षा नित्तुरे यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय

  • दहावी ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धा

पुणे – मुलांच्या गटात तेलंगणाच्या सुहित लंकाने हरियाणाच्या तिसऱ्या मानांकीत उदित कंबोज 6-4, 6-2 असा तर गुजरातच्या मोहित बेंद्रेने तामिळनाडूच्या पाचव्या मानांकीत राजेश कन्ननचा 6-0, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने तेलंगणाच्या तिसऱ्या मानांकीत संस्कृती दमेरा 6-2, 6-3 असा तर कर्नाटकच्या गायत्री बालाने तेलंगणा आठव्या मानांकीत आयरा सुद() 6-3, 6-3 असा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद करताना ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत हरियाणाच्या सुशांत दबसने आपल्या लैकीकाला साजेशी कामगिरी करत गुजरातच्या अर्जुन कुंडूचा 6-1, 6-0 असा तर मध्यप्रदेशच्या दुस-या मानांकीत डेनिम यादवने महाराष्ट्रच्या गिरिष चौगुलेचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या अव्वल मानांकीत सुदिप्ता कुमारने महाराष्ट्रच्या दिविजा गोडसेचा 6-0, 6-0 असा तर दुस-या मानांकीत महाराष्ट्रच्या बेला ताम्हणकरने महाराष्ट्रच्या स्नेहा रानडे 6-2, 6-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

चरिथा पटलोल्ला या तेलंगणाच्या खेळाडूने महाराष्ट्राच्या कामया परब हिचा 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पावनी पाठक या तेलंगणाच्या खेळाडूने सई बालाजी या तामिळनाडू च्या खेळाडूवर 6-4, 6-4 असे पराभूत करत आगेकूच केली. गुजरातच्या माही पांचाल हिने इला दाढे या महाराष्ट्रच्या खेळाडूला 6-2, 6-4 असे नमवले. तर चौथ्या मानांकित महाराष्ट्र गार्गी पवार हिने तमिळनाडूच्या वैष्णवी व्यंकटेश हिचा 6-2, 6-1 असा पराभव केला.

मुलांच्या अन्य सामन्यात चौथ्या मानांकित आर्यन भाटिया याने महाराष्ट्राच्याच बिगर मानांकित कणव गोयल याचा 6-4, 7-5 याचा असा पराभव करत आगेकूच केली. आसामच्या उदित गोगोई आणि गुजरातच्या चेतन गडियार यांचा सामना देखील खूप रोचक झाला. या सामन्यात पहिला सेट उदित गोगोई याने 6-2 असा जिंकला तर दुसऱ्या सेटचा निकाल टायब्रेकरवर लागला.त्यातही त्याने 7-6(4) बाजी मारत हा सामना आपल्या नावे केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:उप उपांत्यपुर्व फेरी: मुले:
सुहित लंका(तेलंगणा) वि.वि उदित कंबोज(हरियाणा)(3)6-4, 6-2
मोहित बेंद्रे(गुजरात)वि.वि. राजेश कन्नन(तामिळनाडू)(5) 6-0, 6-2
सुशांत दबस(हरियाणा)(1)वि.वि. अर्जुन कुंडू(गुजरात) 6-1, 6-0
उदित गोगोई(आसाम)वि.वि. चेतन गडियार(गुजरात) 6-2, 7-6(4)
प्रणित कुदळे(महा)वि.वि. सर्वेश बिरमाने(महा) 6-1, 6-4
आर्यन भाटिया(महा)(4)वि.वि. कणव गोयल(महा) 6-4, 7-5
कार्तिक सक्‍सेना(दिल्ली) वि.वि अमित रुथ(पश्‍चिम बंगाल) 7-5, 6-2
डेनिम यादव(मध्यप्रदेश)(2)वि.वि. गिरिष चौगुले(महाराष्ट्र)6-3, 6-3

उप उपांत्यपुर्व फेरी: मुली:
गायत्री बाला(कर्नाटक) वि.वि आयरा सुद(तेलंगणा)(8) 6-3, 6-3
आकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि संस्कृती दमेरा(तेलंगणा)(3)6-2, 6-3
सुदिप्ता कुमार(महाराष्ट्र)(1) वि.वि दिविजा गोडसे(महाराष्ट्र)6-0, 6-0
चरिथा पटलोल्ला(तेलंगणा) वि.वि कामया परब(महाराष्ट्र)6-2,6-2
पावनी पाठक(तेलंगणा)(5) वि.वि सई बालाजी(तामिळनाडू)6-4, 6-4
माही पांचाल(गुजरात) वि.वि इला दाढे(महाराष्ट्र) 6-2, 6-4
गार्गी पवार(महाराष्ट्र)(4) वि.वि वैष्णवी व्यंकटेश(तमिळनाडू)6-2, 6-1
बेला ताम्हणकर(महाराष्ट्र)(2) वि.वि स्नेहा रानडे(महाराष्ट्र)6-2, 6-2

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button