breaking-newsआंतरराष्टीय

सुषमा स्वराज यांची बेल्जियमच्या उपपंतप्रधानांशी चर्चा

ब्रुसेल्स – बेल्जियमच्या दौऱ्यावर असलेल्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री डिदीयर रेयंडर्स यांच्याशी चर्चा केली आणि द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. तसेच प्रादेशिअ आणि विविध विषयांवरील मतांचे आदानप्रदान केले. आपल्या चार देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये स्वराज बुधवारी लक्‍सेम्बर्ग येथे दाखल झाल्या. त्यापूर्वी त्यांनी फ्रान्स आणि इटलीचा दौरा केला आहे.

Raveesh Kumar

@MEAIndia

And then the formal photo-op welcoming EAM @SushmaSwaraj by Deputy Prime Minister and Foreign Minister of Belgium Didier Reynders at @BelgiumMFA building in .

सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेल्जियमचे उपपंतप्रधान डिदिएय रेयंडर्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली असे, विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी ट्विटरवर सांगितले. स्वराज यांनी युरोपियन संघातील त्यांच्या समपदस्थ फेड्रिका मोघेरिनी यांच्याबरोबरही चर्चा केली.त्यावेळी दहशतवादाला विरोध, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक आदी बहुविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विदेश धोरण आणि सुरक्षा, सायबर गुन्हेगारी.

व्यापार आणि गुंतवणूक या विषयांबरोबर अन्य जागतिक विषयांबाबतही चर्चा झाल्याचे रविश कुमार यांनी सांगितले. रोहिंग्यांची परिस्थिती, अफगाणिस्तान, मालदिवमधील स्थिती, इराण आणि उत्तर कोरियातील निःशस्त्रीकरणाची प्रक्रिया आदी विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Raveesh Kumar

@MEAIndia

Delegation-level talks led by EAM @SushmaSwaraj and Deputy PM and Foreign Minister of Didier Reynders. Both leaders undertook a comprehensive review of our bilateral relationship and exchanged views on regional and multilateral issues. @BelgiumMFA @IndEmbassyBru

बेल्जियममधील मुक्कामाच्या काळामध्ये स्वराज यांनी युरोपिय संघाच्या विविध अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी विचारविमर्शही केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button