breaking-newsआंतरराष्टीय

सुषमा स्वराज यांचा गांधीमार्गावरून रेल्वे प्रवास

पीटरमेरिट्‌सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज दक्षिण आफ्रिकेतील पेंटीच ते पीटरमेरिट्‌सबर्ग मार्गावर रेल्वे प्रवास केला. याच मार्गावर महात्मा गांधींनी सव्वाशे वर्षांपूर्वी, 7 जून 1893 रोजी प्रवास केला होता आणि गोऱ्यांसाठी राखीव डब्यात बसलेला “काला आदमी म्हणून त्यांना पीटरमेरिट्‌सबर्ग स्टेशनवर डब्यातून सामानासह प्लॅटफॉर्मवर फेकून देण्यात आले होते. या प्रसंगातूनच महात्माजींना सत्याग्रहाची प्रेरणा मिळाली होती.

ANI

@ANI

EAM Sushma Swaraj unveils a bust of Mahatma Gandhi at station in South Africa

पाच दिवसांच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी काल फिनिक्‍स वस्तीत वृक्षारोपण केले. दक्षिण आफ्रिकेत राहत असताना महात्मा गांधींनी फिनिक्‍समध्येच अहिंसेचे तत्त्वज्ञान विकसित केले होते.
महात्मा गांधीना ज्यामुळे सत्याग्रहाची प्रेरणा मिळाली होती, तो पेंट्रिंच ते पीटरमेरिट्‌सबर्ग हा प्रवास सुषमा स्वराज यांनी केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्‌विट केली आहे.

Raveesh Kumar

@MEAIndia

EAM @SushmaSwaraj reaches at Pietermaritzburg station where 125 years ago Mohandas decided to fight against injustice and colonialism! 125th anniversary of Pietermaritzburg incident, 100th Birth Centenary of Madiba and 25 years of the diplomatic relations. It couldn’t get bigger.

7 जून 1893 रोजी रेल्वेच्या प्रथमवर्गाच्या डब्यातून मोहनदास करमचंद गांधी नावाच्या तरुण भारतीय वकिलाला रेल्वेच्या डब्यातून प्लॅटफॉर्मवर फेकून देण्यात आले होते. या घटनेतून त्यांना सत्याग्रह आणि अहिंसेची प्रेरणा मिळाली होती. नंतर हाच -प्रसंग नाट्यरूपाने दाखवण्यात येणार आहे,पीटेरमेरिट्‌सबर्ग स्टेशनवर महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button