breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

“सुरक्षित वारी उपक्रमासाठी स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे” – पालकमंत्री गिरीश बापट

पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या १७० स्वयंसेवकांनी पोलीस यंत्रणेस बंदोबस्तासाठी सहकार्य केले. सुरक्षित वारी उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गावर प्रमुख चाैकांमध्ये स्वयंसेवकांनी वैष्णवांना सहकार्य व सेवा दिली. वाट चुकलेल्या ४४ जेष्ठ वारकऱ्यांना त्यांच्या दिंडी चोपदार व व्यवस्थापनाकडे सुखरूपरित्या पोहचविले. त्याचप्रमाणे २६ वारकऱ्यांना वैदयकीय मदत देण्यात आली, अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले की, आपत्कालीन व्यवस्थेकरिता इंद्रायणी नदी घाटावर ४ पोलीस मित्र स्वयंसेवकांनी देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली ‘लाईफ जॅकेट’ सह सलग २ दिवस १४ तास दक्ष राहून काम केले. त्यामुळे घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. गुप्तवार्ता तसेच शोध विभागाच्या २० पोलीस मित्रांनी ३५ संशयित व्यक्तींना पोलीस कर्मचारी अधिकारी यांचेकडे सुपूर्त केले. त्यामुळे चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. सूचना व सावध राहण्याकरिता समितीच्या १० महिला स्वयंसेवक पोलीस मित्रांचा एक गट देहू मंदिर दर्शन बारी परिसरात कार्यरत राहिला. इंद्रायणी घाट परिसर, वैकुंठ मंदिर स्थान, इनामदार वाडा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, महाद्वार मुख्य मंदिर परिसर देहू, १४ टाळकरी कमान परिसर,अनगडबाबा दर्गा परिसर अश्या प्रमुख ठिकाणी समितीच्या १७० स्वयंसेवक पोलीस मित्रांनी पोलीस यंत्रणेला तसेच वारकरी बंधू आणि भगिनींना मदत व सेवा दिली.
या सर्व प्रमुख ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी  गटप्रमुख म्हणुन विजय मुनोत,अर्चना घाळी,संदीप कुंबरे,संदीप सकपाळ,मोहन भोळे,अमोल कानु,मंगेश घाग,बाबासाहेब घाळी,स्वप्नील चव्हाणके,अड.विद्या शिंदे,रेखा भोळे,जयेंद्र मकवाना,प्रदीप पिलाने, राम सुर्वे,अमित डांगे,संतोष चव्हाण,विशाल शेवाळे,नितीन मांडवे,अजय घाडी,सुनिल चौगुले,तेजस सापरिया,राजेश बाबर,अश्विन काळे,सतीश मांडवे,समीर चिले, बळीराम शेवते, तुकाराम दहे,मनोज ढाके,जयप्रकाश शिंदे,शितल धामापूरकर,विभावरी इंगळे,गौरी सरोदे,हृषीकेश साळी यांनी सांभाळली.
या सुरक्षित वारी उपक्रमाचे पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अमर साबळे,आमदार बाळा भेगडे,उल्हासदादा पवार,देहू संस्थान चे प्रमुख बाळासाहेब मोरे यांनी विशेष कौतुक केले.
पालखी सोहळा सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, उपअधीक्षक संदिप पखाले, उप विभागीय अधिकारी गणपत माडगुळकर,पोलीस निरीक्षक प्रकाश धस,सहा.पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर,मनोज पवार,ए.एम.लांडगे समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button