breaking-newsपुणेमहाराष्ट्र

सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमावर भाजप आमदार, नगरसेवकांचा बहिष्कार

पिंपरी : शहर पातळीवरील भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची पूर्णपणे छाप असलेल्या मतदारसंघात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या चिंचवडमधील कार्यक्रमावर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे रविवारी दिसून आले. राज्यसभेचे खासदार अमर साबळे व महापौर नितीन काळजे यांचा अपवाद वगळता इतरांनी धावती हजेरी लावली. तर, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार आदींनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते होते. या निमित्ताने त्या पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार बारणे यांची पूर्ण छाप या कार्यक्रमावर होती, त्यामुळे आपल्याला फारसे स्थान नसल्याची जाणीव भाजप नेत्यांना होती. त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी धावती हजेरी लावली. पक्षाचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी फिरकले नाहीत. आमदार जगताप व लांडगे या कार्यक्रमाला आलेच नाहीत. खासदार साबळे व महापौर काळजे यांचीच व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी महाजन यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली, तेव्हा त्यांनी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button