breaking-newsमनोरंजन

सुबोध भावेला भेटवण्याच्या नावानं उकळले जात आहेत पैसे

अभिनेता सुबोध भावे याची भेट घालून देतो असं सांगून चाहत्यांकडून पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुबोधनं स्वत: आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या संदर्भात माहिती देत चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मला भेटवण्यासाठी कोणी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका’ असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहित चाहत्यांना सतर्क केलं आहे. ‘माझा सख्खा भाऊ “सूनीत ” सोडून “भावे” आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही त्यामुळे माझ्या नावे कोणी पैसे उकळत असेल तर त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका’ असं सुबोधनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आवडत्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीची भेट घालून देतो असं सांगून आतापर्यंत अनेक चाहत्यांना फसवलं जात असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत खूपच वाढले आहे. त्यामुळे सुबोधनं ही पोस्ट टाकत आपल्या चाहत्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button