breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या तरुणाला चोपले

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणा-या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडल्याची घटना कोल्हापुरात घडली. एका बातमीवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळेंविषयी अपशब्द तरुणांने वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय तांबवेकरच्या घरी पोहचले आणि त्याला चोप देत माफी मागायला लावली.

सोशल मिडीयावरून आक्षेपार्ह कमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेय यांच्याबद्दल कमेंट करणा-या घाटकोपर येथील एका तरुणाला मनसैनिकांनी बदडले होते. आता कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर या तरुणाला सुप्रिया सुळेंविषयी फेसबुक अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढले आहे. याबाबतचा व्हिडीओ राष्ट्रावादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button