breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सुप्रिया-सदानंद सुळेच्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त जेजूरीत घेतलं खंडेरायाचं दर्शन

जेजुरी  –  बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज आपल्या मतदारसंघातील जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला पती सदानंद सुळे यांच्यासह गेल्या. यावेळी सदानंद सुळे यांनी पत्नी सुप्रिया यांना उचलून घेत जेजुरी गडाच्या पाच पाय-या चढले. जेजुरीच्या खंडेरायाच्या दारात पतीने पत्नीला उचलून न्यायचे अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आपल्या लग्नाच्या 28 व्या वाढदिवशी सदानंद सुळे यांनी हा पन पूर्ण केला.

सुप्रियाताई आणि सदानंद सुळे यांचा विवाह आजच्या दिवशी म्हणजे 4 मार्च 1991 रोजी बारामतीत अतियश साध्या पद्धतीने झाला होता. सुप्रियाताई आणि सदानंद सुळे आज आपल्या लग्नाचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शिवाय आज महाशिवरात्रीचाही आहे. असा दुग्धशर्कराचा योग जुळून आल्याने सुप्रिया सुळे आपले पती सदानंद यांच्यासह जेजुरीच्या गडावर खंडेरायाच्या दर्शनाला पोहचल्या. यावेळी त्यांच्यासमवेत काही कार्यकर्ते होते. यावेळी सदानंद सुळे यांनी पत्नी सुप्रिया यांना पाच पावले (पाच पाय-या) उचलून घेऊन गडावर जावे, असा आग्रह धरला. सदानंद सुळे यांनीही तो मान्य केला. मात्र, अशी सवय नसल्याने सदानंद सुळे यांना अवघडल्यासारखे वाटले. मात्र, दमछाक झाली तरी प्रथेप्रमाणे ते सुप्रियाताईंना उचलून घेत गडाच्या पाच पाय-या चढले. यावेळी सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सदानंदाचा… यळकोट यळकोट… जय मल्हार… अशा घोषणा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button