breaking-newsराष्ट्रिय

सीमारेषावर पाकचा बेछुट गोळीबार…

  • भारताच्या 15 चौक्‍या निशाण्यावर ः बीएसएफ जवानासह दोघे जखमी 

जम्मू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्‍मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्‍मीरच्या सांबा आणि कठुआ जिल्ह्यात गुरुवारी आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील 15 चौक्‍यांना लक्ष्य करत बेछुट गोळीबार आणि मोर्टार गोळे फेकले. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानासह दोघे जखमी झाले आहेत.

बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा आणि हिरानगर सेक्‍टरमध्ये जोरदार गोळीबार करत मोर्टार गोळे फेकत हल्ला केला. रेंजर्सनी बीएसएफच्या डझनभर चौक्‍यांवर रात्रभर गोळीबार केला. रीगल पोस्टवर तैनात असलेला एक जवान या गोळीबारात जखमी झाला. बीएसएफने पाकिस्तानच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले.

हीरानगर क्षेत्रात झालेल्या तुफान गोळीबारात लोंडी गावातील दौलत राम हे जखमी झाले आहेत. त्यांना हीरानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासुन सुरू असलेल्या गोळीबारामुळे स्थानीक ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून सर्वसामान्य हालचाली बंद झाल्या आहेत. तसेच सीमांत क्षेत्रातील सर्व शाळांना पुढील आदेश देईपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. हीरानगर सेक्‍टरमध्ये सुमारे 19 गावे ही सीमा रेषालगत आहेत.

तसेच सांबा सेक्‍टरमधील मंगू चक आणि रिगाल बीएसएफच्या चौक्‍यांवर तैनात पाकिस्तानने बेछुट गोळीबार केला. सांबा जिल्ह्यातील वीरवार येथे सकाळी तुफान गोळीबार करत सीमा सुरक्षा दलाच्या बारा चौक्‍यांवर निशाणा साधण्यात आला. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, दि. 19 मे रोजी जम्मू-काश्‍मीर दौऱ्यावर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button