breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“सीएनजी’ दरवाढीचा पीएमपीला फटका

  • प्रति 3 रु. किलोने वाढ ः दररोज 2 लाख रुपयांचा फटका
    यापूर्वी डिझेल दरात झाली आहे वाढ

पुणे – अर्थिक तोट्यात धावणाऱ्या पीएमपी प्रशासनाला डिझेलपाठापाठोपाठ आता सीएनजी (क्रिस्टलाईज नायट्रेट गॅस) पुरवठा करणाऱ्या कंपनीने इंधन किंमतीत 3 रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. यामुळे पीएमपीला दिवसाला जवळपास 2 लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
सीएनजीवर धावणाऱ्या पीएमपीच्या 1 हजार 24 बस आहेत. यासाठी दररोज 65 हजार किलो सीएनजीची गरज आहे. हा पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड कंपनीकडून केला जातो. आजवर पीएमपीएलला सवलतीच्या दरात पुणे महानगर क्षेत्रात 46 रुपये 30 पैसे, तर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 45 रुपये 80 पैसे किलो दराने गॅस पुरवठा केला जात होता. मात्र, 16 जूनपासून या दरात कंपनीने वाढ केली आहे. यामुळे आता नव्या दरानुसार पुणे महापालिका क्षेत्रात सीएनजी गॅसचा दर 49 रुपये 30 पैसे, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 48 रुपये 80 पैसे असणार आहे. पण, हे भाव वाढल्याने दररोज सुमारे 2 लाख रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

सीएनजी दरवाढीमुळे पीएमपीएमएलवर अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे सीएनजी दरवाढीनुसार तोटा कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांकडून संचलन तूट घेण्यात येणार आहे.
– नयना गुंडे, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button