breaking-newsमनोरंजन

‘सिम्बा’ चित्रपटाचे तेरे बिन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा चांगलाच चर्चेत आहे. यानंतर आता रणवीर सिंहच्या आगामी ‘सिम्बा’ चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. यातच ट्रेलरच्या सुरुवातीला सिंघम चित्रपटातील अजय देवगणचेही काही सीन्स दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेलरनंतर आता  चित्रपटातील गाण प्रदर्शित झाले असून ते  ‘तेरे बिन’ या गाण्याचे रिमेक आहे, जे प्रेक्षकांची पसंती येत आहे

‘तेरे बिन’ हे गाण रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्यावर चित्रित केले आहे. रणवीर आणि सारा या गाण्यात रोमँटिक दिसत आहेत. त्यांची ऑन स्क्रीन जोडी खूप सुंदर दिसत आहे. याबाबत रणवीरने ट्विट द्वारे प्रेक्षकांना माहिती दिली आहे.  दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह, सारा अली खान आणि सोनू सूद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष राणाही  झळकणार आहेत. ‘सिम्बा’ हा दक्षिणेतील स्टार ज्युनिअर एनटीआर यांच्या ‘टेम्पर’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये रणबीर एक भ्रष्ट पोलिस अधिकारी एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडल्यावर खूप बदलून जातो, अशी याची कथा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button