पिंपरी / चिंचवड

“सिटी प्राईड” स्कूलमध्ये बाबासाहेबांना विद्यार्थ्यांनी केले अभिवादन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकराना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमोल भालेराव, सामाजिक कार्यकर्ते विलास पोळ, विशाल जाधव मुख्याध्यापिका श्राबानी पत्रनाभिश तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

“शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाचे माणसाला आपले  कर्तव्य व हक्काची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत: ची जाणीव व्हावी, यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत, असे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूंवर आपले मनोगत व्यक्त केले.

श्राबानी पत्रनाभिश यांनी सूत्रसंचालन केले. आभार हेमा शेलार यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button