breaking-newsपुणे

सिग्नल सुसूत्रीकरण प्रकल्पात अनेक तांत्रिक अडचणी!

  • सिग्नलची अपुरी संख्या; प्रत्येक सिग्नलच्या वेगवेगळ्या वेळा

शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या वीस मार्गाचे सर्वेक्षण करून या मार्गावरील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे (सिग्नल) सुसूत्रीकरण (सिंक्रोनायझेशन) करण्यात येईल, असे स्मार्ट सिटी आणि वाहतूक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले असले तरी सुसूत्रीकरणाच्या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावरील सिग्नलची अपुरी संख्या, प्रत्येक सिग्नलच्या वेगवेगळ्या वेळा, मार्गावरील वाहतुकीनुसार सिग्नलच्या कमी-अधिक कराव्या लागणाऱ्या वेळा आणि सिग्नल पुरविणाऱ्या भिन्न कंपन्या यामुळे वीस मार्गातील सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याच्या प्रकल्पाला अनेक मर्यादा येण्याची शक्यता आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका, स्मार्ट सिटी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून संयुक्त प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत स्मार्ट सिटीकडून वाहतूक पोलिसांना वीस मार्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत सांगण्यात आले होते. रस्त्यावरील चौकांची संख्या, वाहतुक कोंडी होण्याची ठिकाणे, सिग्नलचा कालावधी यांचा प्राथमिक अभ्यास करून सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र जोपर्यंत अ‍ॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमची (एटीएमस) अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मानवविरहित सुसूत्रीकरण अवघड ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button