breaking-newsपिंपरी / चिंचवड

सावाईन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू

पिंपरी (महा ई न्यूज) – स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यूने आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी 2018 पासून आजअखेर पर्यंत स्वाईन फ्लूने 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील 50 वर्षीय महिलेला स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यावरून शुक्रवारी (दि. 21) एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्ल्यूचा त्रास वाढल्याने त्याच दिवशी त्या महिलेला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान सोमवारी (दि. 24) त्या महिलेचा मृत्यू झाला.

संत तुकाराम नगर पिंपरी येथील एका 53 वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यावरून मंगळवारी (दि. 18) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्याने त्यांना त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचा देखील मंगळवारी (दि. 25) मृत्यू झाला.

शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 29 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज चार जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. चार रुग्ण सध्या कृत्रिम श्वासोच्छ्वासावर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button