breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावधान : स्वाईन फ्लुचा आणखी एक बळी; दिवसभरात 10 पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी (महा ई  न्यूज) – शहरामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केले. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने तब्बल 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सोमवारी (दि. 24) 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भोसरीतील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूवर उपचार घेणारे 60 वर्षीय रुग्ण दगावला आहे. स्वाईन फ्ल्यूचा त्रास वाढल्याने त्यांना दुस-या दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. सोमवारी (दि. 10) रोजी त्यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु उपचार सुरु असताना शनिवारी (दि. 22) त्यांचा मृत्यू झाला.

स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे, तसेच डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button