breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना चेहऱ्यावर केक लावाल, तर तुरुंगात जाल

सूरत। वाढदिवस साजरा करताना तोंडावर केक थापायची पद्धत सध्या आपल्याकडे रूढ झाली आहे. खायचा कमी आणि तोंडावर थापायच्या या पद्धतीमुळे मात्र तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. गुजरात राज्यातील सूरतमध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर वाढदिवस साजरा करताना एखाद्याच्या चेहऱ्यावर केक लावणे, थापणे किंवा फोम सारखे केमिकल चेहऱ्यावर लावल्यास तुरुंगाची हवा खाली लागणार आहे. सोमवारी पोलिसांनी याप्रकरणी निर्देश जारी केले आहेत.

वाढदिवस साजरा करताना लोकं सार्वजनिक स्थळांवर हिंसक होताना दिसून आल्याने हे निर्देश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतर कलम 188 अन्वये स्पेशल ब्रान्चचे पोलीस अधिकारी पीएल चौधरी यांनी सार्वजनिक अधिसूचना काढली. यात त्यांनी अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात येईल असे म्हटले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्या मते ,’काही घटनांमध्ये वाढदिवस साजरा करताना लोकांना दुखापती झाल्या आहेत. डुमास रोड आणि काही पुलांवर अशा घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या घटना रोखण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.’ आता पोलीस सार्वजनिक ठिकाणी जन्मदिवस साजरा करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button