breaking-newsताज्या घडामोडीपुणे
सायकल, श्रवण यंत्र आणि चप्पल वाटणे ही खासदाराची कामे नाहीत – विजय शिवतारे
पुणे – सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे ही खासदाराची कामे नाहीत, अशा शब्दात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे करतात त्या स्वरूपाची कामे समाजातील अनेक मंडळांचे पदाधिकारी करतात. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत. मागील निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यांमधून मताधिक्य मिळाल्याने त्या विजयी झाल्या आहेत. इतर तालुक्यात फार कमी मते मिळाली असं सांगायलाही ते विसरले नाहीत.