breaking-newsक्रिडा

सानिया मिर्झाची बहिण पतीपासून घेणार घटस्फोट

हैदराबाद : भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाची धाकटी बहिण अनम मिर्झाचा संसार दोन वर्षांच्या आतच मोडला आहे. अनमने पती अकबर रशीदपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचा निकाह नोव्हेंबर 2016 मध्ये झाला होता. वेगळे होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनम ही सानियाची स्टायलिस्ट असून तिचे स्वत:च फॅशन आऊटलेटही आहे.

अनमचं लग्न धूमधडाक्यात झाले होते. सलमान खान, परिणीती चोप्रा, अर्जुन कपूर, हुमा कुरेशी, लारा दत्त यांनीही तिच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. इतकेच नाही तर सलमान आणि परिणीतीने लग्नात डान्सही केला होता. अकबर रशीदचा हैदराबादमध्ये बिझनेस आहे. लग्नाआधी अकबर आणि अनम रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा साखरपुडा 2015 मध्ये झाला होता. तर नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button