पिंपरी / चिंचवड

साई मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि राष्ट्रवादीच्या मीना मोहिते यांचा सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे सौदागर येथील साई मंदिरच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त महापूजा आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभाग पुणे जिल्हा अध्यक्षा मीना मोहिते यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी साई मंदिराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचबरोबर चौफुला येथे राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून करण्यात आले. यावेळी पीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे, पुणे जिल्हाध्यक्षा मीना श्रीरंग मोहिते, संजय धायगुडे, सुरेंद्र मोरे, रजनी पाटील, दौंड तालुकाध्यक्ष विक्रम पवार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button