breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांडपाण्यावर प्रक्रिया, पुनर्चक्रीकरण व पुनर्वापराचा ‘मास्टर प्लान’ तयार

  •   सांडपाण्याच्या धोरणास विधी समितीची मान्यता 
  •  शहराच्या भाैगोलिक रचनेनुसार चार भागात विभागणी 
  • पहिल्या टप्प्यांचा स्मार्ट सिटीच्या एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये समावेश 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  घरगुती व आैद्योगिक पाणी वापराच्या अनुक्रमे 80 ते 97 टक्के सांडपाणी निर्माण होत आहे. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात दररोज 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होत आहे. नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया, पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर करण्यासाठी शहराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच भाैगोलिक रचनेनुसार पिंपरी चिंचवड शहराचा चार भागात विभागणी केली असून पहिल्या टप्प्यातील पिंपळे साैदागर, वाकड, हिंजवडी आणि चिंचवड एमआयडीसीचा स्मार्ट सिटीच्या एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये समावेश केला आहे. सदरील सांडपाण्यावर प्रक्रिया, पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर धोरणास विधी समितीच्या आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली. हे धोरण 20 डिसेंबरच्या महासभेपुढे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी दिली. 

आैद्योगिक विकास, तंत्रज्ञानाची व शैक्षणिक संस्थाची उपलब्धता यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा विकास झपाट्याने झाला. या आर्थिक विकासाचा बोजा नैसर्गिक साधन संपत्तीवर पडत आहे. तसेच हवामान बदलाच्या परिणामामुळे जल संसाधने व व्यवस्थापनात अनियमितता येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत आहे. त्यातील सुमारे 312 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात जलस्त्रोत निर्मिती, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन व नियोजनपुर्ण वापर ही काळाची गरज आहे.

महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या 30 ते 50 टक्के पर्यंत पाणी वापर सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याने पुर्नचक्रीकरण व पुर्नवापरच्या माध्यमातुन करणे, शहरातील एमआयडीसी अखत्यारीत आैद्योगिक विभाग, हिंजवडी, चाकण, तळवडे या भागात प्राधान्याने पाणी पुरवठा करुन बचत होणारे पाणी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर एका प्रभागात 2016 मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुर्नवापर करण्यास स्त्रोत पथदर्शी प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे नागरी भागात तयार होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुर्नचक्रीकरण व पुर्नवापर करण्यास पिंपरी चिंचवडचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अमंलबजावणी  करताना आयआयटी किंवा निरी संस्थेने विकसित केलेल्या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग प्राधान्याने करण्यात येणार आहे.

नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया व पुर्नवापर करण्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेला निधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून, पीपीपी माध्यमातून उभारण्यात यावा, सदरील धोरणानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत प्रक्रिया केलेल्या पाण्यापासून मिळणा-या रक्कमेवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हक्क राहणार आहे.

शहर आराखड्यात भाैगोलिक रचनेनुसार चार विभाग पाडण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पिंपळे साैदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड एमआयडीसीचा समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतील एरिया बेस डेव्हलमेंटमध्ये पहिला टप्यांचा समावेश करुन हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रतिदिन 75 दशलक्ष लिटर प्रक्रियेचे केंद्र कासारवाडीत उभारण्यात येत आहे. दुस-या  टप्प्यात चिखली एमआयडीसीत 5 दशलक्ष लिटर प्रक्रिया केंद्र उभारणे, तिस-या टप्प्यात निगडी प्राधिकरण, तळेगाव एमआयडीसी आणि चाैथ्या टप्प्यात चाकण एमआयडीसी समावेश आहे. सदरील योजनेंचा अंदाजित खर्च सुमारे चारशे कोटी इतका असणार आहे.

या पाण्याचा पुर्नवापर हा आैष्णिक विदुयत केंद्राना प्रक्रियायुक्तपाणी पुरविण्यास, एमआयडीसीतील प्रक्रियायुक्त पाणी पुरविण्यास, रेल्वे किंवा अन्य मोठ्या प्रमाणात खरेदीदार यांना प्रक्रियायुक्त पाणी पुरविण्यास, शहरातील बांधकाम व्यावसायिक, सव्हीस सेंटर, लाॅन्ड्रीज, इतर व्यावसायिक इमारती, कुर्लींग टाॅवर, हाैसिंग सोसायट्यांना, विविध उद्याने, पार्क, खेळाची मैदाने, कृषी प्रयोजनार्थ पाणी तसेच पिण्यास योग्य नसलेल्या घटकांसाठी पाण्यासाठी पुर्नवापर करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य पाण्याचा पुर्नवापर बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, लोक सहभागातून (पीपीपी) पुर्नचक्रीकरण, पुर्नवापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे.  या आराखड्यास विधी समितीने मान्यता दिली असून महासभेपुढे अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button