breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सहा वर्षांच्या लढाईनंतर सांगवीत अनधिकृत बांधकामावर कारवाई

पिंपरी – सांगवीच्या प्रियदर्शनीनगर येथील भाऊबंदकीच्या वहिवाटीच्या वादातील बांधकामावर आज (मंगळवार) महापालिका बांधकाम व अतिक्रमण विभागाने कारवाईस सुरूवात केली आहे. येथील रहिवाशी सरिता ज्ञानोबा काची या स्वताच्या जागेतील वहिवाट रस्त्यासाठी गेली सहा वर्षापासुन न्यायालयीन लढा दिला आहे.

काची यांच्या जागेसमोर भाऊबंदकीने 3000 स्के.फुट जागेत घर व व्यावसायिक बांधकाम केलेले असुन काची यांना रस्ता नसल्याने त्यांनी गेल्या सहा वर्षापासुन मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी, यांच्याकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर गेल्या सहा वर्षापासुन जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात ते दाद मागत होते.

सातबाराप्रमाणे मुळ १६७० स्क्वे.फुट जागेवर खोट्या नोंदी लावुन तिन हजार स्क्वे.फुट अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार त्यांनी महापालिकेकडे केली होती. महापालिका व स्थानिक प्रशासन अधिका-यांनी त्या कारवाईकडे दुर्लक्ष केले होते.  तसेच काची यांनी गेल्या सहा वर्षात ५१३ तक्रार अर्ज विविध विभागांकडे केल्या होत्या. यावर मुख्यमंत्री कार्यालय, प्रधान सचिव, नगरविकास विभागाकडुन पिंपरी चिंचवड महापालिकेस उचित कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
तरीही कारवाईस विलंब होत असल्याने सोमवारी (दि.१५) पिंपरीतील डॅा.बाबासाहेब आंबेडकर चाैकात सरीता काची यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली. अखेर दुस-या दिवशी येथील बांधकामावर मोठ्या पोलिस बंदोबस्तासह कारवाईस सुरूवात करण्यात आली. या व्यावसायिक बांधकामात दोन बंकाचे एटीएम  केंद्र, एक हॉटेल होते. एटीएम मशीन हलविण्यासाठी संबंधित बँकांना पाचारण करण्यात आले होते. व्यावसायिक बांधकामावर कारवाई करत एटीएम केंद्र, हॉटेल गाळे मोकळे करून सायंकाळी साडेचार पर्यंत ही कारवाई सुरू होती. यावेळी अतिक्रमण विभागाचे अभियंता मनोज सेठिया यांनी येथिल व्यावसाईक बांधकामवर कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button