breaking-newsआंतरराष्टीय

सहाराचे न्युयॉर्क मधील हॉटेल कतार सरकारने विकत घेतले

न्युयॉर्क – न्युयॉर्क मधील सहारा कंपनीचे प्रख्यात द प्लाझा हे हॉटेल कतार सरकारने तब्बल 600 दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम मोजून विकत घेतले असल्याचे वृत्त आहे. कतार सरकारच्या मालकीच्या कतारा होल्डींग कंपनीने हा व्यवहार एकहाती स्वरूपात केला आहे. या हॉटेलची 75 टक्के मालकी सुब्रता रॉय यांच्या मालकीच्या सहारा उद्योग समुहाकडे होती.

या व्यवहारामुळे सहारा कंपनीला आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यास मोठीच मदत होणार आहे. कतारा होल्डींगने सहारा उद्योग समुहाची 75 टक्के मालकी आणि अमेरिकेतील अशकेंझी ऍक्वीझीशन कार्पोरेशनकडे असलेली 25 टक्के मालकी विकत घेतली आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या नियतकालिकाने दिले आहे. या वृत्ताविषयी सहारा कंपनीकडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. 282 खोल्यांचे हे प्रशस्त हॉटेल आहे.

न्युयॉर्क मधील एक लॅंडमार्क इमारत म्हणून या हॉटेलची इमारत ओळखली जाते. 1907 साली सुरू झालेले हे हॉटेल अमेरिकेच्या ऐतिहासिक वास्तुंच्या यादीतील आहे. त्यामुळेच त्याला विशेष महत्व आहे. हे हॉटेल खरेदी करण्यात जगभरातील गुंतवणुकदारांनी रस दाखवला होता पण त्यापैकी कोणाचाच व्यवहार पुर्ण झाला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या वास्तुत मोठा रस असल्याचे सांगितले गेले आहे.

स्वत: ट्रम्प यांनी या वास्तुची तुलना मोनालिसाशी केली होती. भारतातील सहारा उद्योग समुहाने या हॉटेल मधील 75 टक्के मालकी सन 2012 मध्ये 575 दक्षलक्ष डॉलर्सला खरेदी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button