breaking-newsराष्ट्रिय

सवर्ण आरक्षण : युवा शक्तीला आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार – मोदी

संसदेच्या दोन्ही सभागृहात १२४व्या घटनादुरुस्तीद्वारे मांडण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठीच्या आरक्षणाला मंजुरी मिळाली. त्यामुळे आता देशातील युवा शक्तीला देशाच्या विकासात आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

View image on Twitter

ANI

@ANI

Prime Minister Narendra Modi: Passage of The Constitution (124th Amendment) Bill, 2019 in both Houses of Parliament is a victory for social justice. It ensures a wider canvas for our Yuva Shakti to showcase their prowess and contribute towards India’s transformation. (file pic)

बुधवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मोदींनी आनंद व्यक्त केला. रात्री उशीरा त्यांनी ट्विट करीत म्हटले, राज्यसभेत १२४व्या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्याने मी खूष आहे. या विधेयकाला मिळालेले व्यापक समर्थन पाहून मला अत्यंत आनंद होत आहे.

Narendra Modi

@narendramodi

Delighted the Rajya Sabha has passed The Constitution (One Hundred And Twenty-Fourth Amendment) Bill, 2019.

Glad to see such widespread support for the Bill.

The House also witnessed a vibrant debate, where several members expressed their insightful opinions.

या विधेयकावर संसदेत खूपच चांगली चर्चा झाली. यावर अनेक सदस्यांनी आपली व्यवहारिकता दाखवली. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर होणे हा सामाजिक न्यायाचा विजय आहे. यामुळे यापल्या युवा शक्तीला आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यापक कॅनव्हास मिळेल तसेच भारताच्या विकासात योगदान दिल्याचे समाधान मिळेल, असेही मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोदी पुढे म्हणाले, हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करुन आम्ही आमच्या संविधान निर्मात्यांना आणि महान स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यांनी एका सशक्त आणि सर्वसमावेशक भारताची कल्पना केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button