breaking-newsपिंपरी / चिंचवड

सराफाच्या दुकानात अडीच लाखांची चोरी

पिंपरी –  सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख ६४ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

आशिष अशोक सिरोया (रा. लक्ष्मी विलास सोसायटी, मुकुंदनगर, पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष यांचे निगडीतील साई श्रद्धा क्लासिक इमारतीमध्ये चंदन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आतील ५४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तीन किलो ८०० ग्रॅम वजनाची चांदी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button