breaking-newsराष्ट्रिय

सरकार स्थापन करण्यासाठीचे पर्याय…

नवी दिल्ली – भाजप 104 जागा जिंकत कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याने नियमाप्रमाणे राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचे आंमत्रण देतील. मात्र पक्षाला बहुमत सिध्द करण्यासाठी जनता दलाचा पाठिंबा घ्यावा लागेल.
जनता दलाने मुख्यमंत्री आमचा हवा अशी ठाम भूमिका जाहीर केली आहे. भाजपाने ती मान्य केल्यास भाजपा सत्तेत राहील. पण जनता दलने कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविल्याने ही शक्‍यता कमी आहे.

भाजपा बहुमत सिद्ध करू न शकल्यास दुसऱ्या पक्षांना म्हणजे कॉंग्रेस व जनता दलाला संधी देण्यात येईल.दोन्ही पक्षांनी युती केली तर जनता दलाचा मुख्यमंत्री होण्यास कॉंग्रेसना होकार दर्शवला असल्यामुळे युतीचे सरकार सत्ता स्थापन करेल.
– कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग भाजपने बांधला आहे. यासाठी भाजपने विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न केल्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार किमान एक तृतीयांश आमदारांना पक्षांतर करावे लागले. मात्र, सद्य स्थितीत ते अशक्‍य वाटते.

दुसरा पक्ष म्हणजे भाजप विरोधी पक्षातील विजयी उमेदवारांना आपल्याकडे वळवून राजीनामा द्यायला सांगू शकतो. जर 8 ते 10 आमदारांनी राजीनामा दिल्यास भाजप सहज बहुमताचा आकडा पार करू शकेल त्यानंतर फेरनिवडणूकीत राजीनामा दिलेल्या आमदारांना सत्तेत सामावून घेऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button