महाराष्ट्रराजकारण

सरकारने शेतक-यांच्या संसारावर नांगर फिरवला; सत्यजित देशमुख यांचा आरोप

  • इंधन दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसचा तिरडी मोर्चा

शिराळा (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून शेतकरी व सर्वसामान्य माणसाचे संसार उघडण्यावर आणण्याचा डाव भाजप सरकारचा आहे. या सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरविणारे आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी सरकारवर टिका केली. तर, उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. कष्टकरी, शेतात राबणाऱ्या लोकांना भेटून त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

शिराळा येथे शिराळा विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या महागाई विरोधी मोर्चात ते बोलत होते. यावेळी बिऊर ते शिराळा महागाई विरोधी मोटारसायकल रॅली व एसटी आगार ते तहसिल कार्यालयपर्यंत मोटारसायकल ढकल मोर्चा व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल तिरडीवर ठेवून तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी २ हजार ५०० मोटारसायकली तहसिल कार्यालयावर ढकलत आणून सरकारचा पेट्रोल, डिझेल आणि दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात आला. ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख, माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील, के. डी. पाटील, महादेव कदम, कामेरीचे जयराज पाटील, शिराळा विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदीप जाधव, शिराळा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

सत्यजित देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून गेल्या ४ वर्षात कायम शेतकरी विरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या मालाची भाववाढ करायची, आणि शेतमालास हमीभाव द्यायचे नाहीत. दर, पाडायचे जेणेकरून शेतकरी अडचणीत आला पाहिजे. तो कोलमडून पडला पाहिजे. तो कोलमडून पडला की राजकीय पाळेमोळे रोवता येतील अशी भ्रमक कल्पना या सरकारची दिसून येते. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरवाढीत जगाच्या स्पर्धेत भारत अव्वलस्थानी असेल. या सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. जनतेचा खदखदनारा आवाज सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन हातात घेतले आहे. सरकारी नोकरभरती थांबविल्याने तरुणांचे नुकसान होत आहे. सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा आहे.

हणमंतराव पाटील म्हणाले की, कर्जमाफी हि पूर्णता फसवी आहे. आजपर्यंत या कर्जमाफीचा घोळ कुणालाच सुटलेला नाही. कॉंग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी हीच ऐतिहासिक कर्जमाफी होती. भाजप सरकार जनतेला अडचणीत आणण्याचे निर्णय घेत आहे.

यावेळी संग्रामसिंह पवार, संदीप जाधव, जयराज पाटील, नेर्ले माजी सरपंच जयकर कदम, आनंदराव पाटील, संपतराव देशमुख, सत्यजित पाटील, महादेव कदम, सम्राटसिंह शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत तानाजी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले. पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, हिंदुराव नांगरे, सुजित देशमुख, बाजीराव पाटील, विकास नांगरे, एन.डी.पवार, श्रीरंग नांगरे, पोपट पाटील, बाजीराव शेडगे, मनोज चिंचोलकर, अँड. रवि पाटील, अभिजित पाटील, सुहास पवार, बाबा पाटील, धनाजी नरुटे, संपत पाटील, भोजराज घोरपडे, राजवर्धन देशमुख, शिवाजी गायकवाड, डॉ.पी.डी.पाटील, अजय जाधव, मोहन पाटील, अशोक पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप कदम, उत्तम गावडे, बाळासाहेब खोत, प्रा.सम्राटसिंह शिंदे, जयदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोर्चात सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button