breaking-newsपुणे

सरकारच्या विरोधात सोमवारी काॅंग्रेसचे पिंपरीत लाक्षणिक उपोषण

पिंपरी – देशातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी या सर्वांसह लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारीतेची मुस्कटदाबी सुरु आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि आरएसएसच्या धार्मिक व्देष पसरविणा-या मार्गदर्शनामुळे हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 9) काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी शहर काॅंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी शहर कॉंग्रेस कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कमिटी आणि युवक व इतर सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कॉंग्रेसप्रेमी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button