breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवा – लक्ष्मण जगताप

पिंपरी –  केंद्रातील भाजपाच्या एनडीए सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याबद्दल 6 मे ते 11 जून कालावधीत पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे संपर्क अभियान राबविण्यात आले. यामध्ये ‘सर्वांनी पक्षाने आखून दिलेल्या ‘व्यवस्थेव्दारे’ काम करावे. पक्षासाठी काम केले तर त्याचा उपयोग भविष्यात नक्कीच होईल. तसेच  प्रत्येकांनी पक्षांनी दिलेली विविध योजनांची माहिती पत्रके लोकांपर्यंत पोहोचवावीत’ असे प्रतिपादन शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. ‘

निगडी येथील सावरकर भवनात शहर भाजपातर्फे संपर्क अभियानाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन ते बोलत होते. या कार्यक्रमास महापौर नितीन काळजे, शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, सदशिव खाडे, प्रदेश चिटणीस उमा खापरे आदी पदधिकारी व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.

रवी अनासपुरे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. तसेच भाजपाने तयार केलेली प्रगती पुस्तिका घरोघरी देवून प्रत्येक घरात पक्षाचा सदस्य तयार करा, असे प्रतिपादन भाजपचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले. ”विविध क्षेत्रात काम करणारे व पक्ष विचारसरणी पासून वंचित असणा-या नागरिकांशी संपर्क करून चार वर्षात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतलेले निर्णय, त्यांचा सर्व सामन्यांना होणारा लाभ याबाबत माहिती देण्यात यावी. त्यावर त्यांची मते, सूचना जाणून घेण्यात यावीत”

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button