breaking-newsक्रिडा

समीर धर्माधिकारी, कैवल्य चव्हाण, कृणाल वासवानी यांचे संषर्घपूर्ण विजय

  • डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुली स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा 

पुणे – डेक्‍कन जिमखानाच्या समीर धर्माधिकारी, सातारच्या कैवल्य चव्हाण व पूना क्‍लबच्या कृणाल वासवानी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करून पहिल्या डेक्‍कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. डेक्‍कन जिमखाना क्‍लबतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

डेक्‍कन जिमखाना येथील स्नूकर हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत आज झालेल्या पहिल्या लढतीत डेक्‍कनच्या समीर धर्माधिकारी याने ठाण्याच्या निलेश पाटणकर याचा 57-33, 37-53, 16-52, 54-22, 54-27 असा पराभव केला. तसेच दुसऱ्या लढतीत पूना क्‍लबच्या कृणाल वासवानी याने क्‍यू क्‍लबच्या अमित पराशर याचा 21-53, 45-35, 30-45, 68-36, 45-43 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. या सामन्यात कृणाल याने निर्णायक फ्रेममध्ये केवळ दोन गुणांची आघाडी घेत हा अटीतटीचा सामना खिशात घातला.

आज झालेल्या तिसऱ्या रंगतदार लढतीत सातारच्या कैवल्य चव्हाण याने एलफिस्टनच्या विलास उपशाम याचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात कैवल्यने पहिली फ्रेम 71-44 अशी जिंकली. तर विलासने दुसरी फ्रेम 53-35 अशी जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर विलासने तिसरी फ्रेमही 56-49 अशी जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. मात्र कैवल्यने पिछाडीवरून सुरेख खेळ करताना 70-58, 61-36 अशा दोन्ही फ्रेम जिंकत सामन्यात विजय मिळवला.

सविस्तर निकाल – 
पहिली फेरी- समीर धर्माधिकारी (डेक्‍कन जिमखाना) वि.वि. नीलेश पाटणकर (ठाणे) 57-33, 37-53, 16-52, 54-22, 54-27, ऍरान्ता सॅंचेस (न्यू क्‍लब) वि.वि. माधव क्षीरसागर (डेक्‍कन जिमखाना) 60-15, 78-01, 76-20, आकाश पाडाळीकर (एपीज्‌) वि.वि. शुभम रानडे (क्‍यू क्‍लब) 64-18, 41-52, 71-18, 63-35, मिलिंद कुऱ्हाडे (क्‍यू स्पोर्टस्‌) वि.वि. अभिषेक बोरा (कॉर्नर पॉकेटस्‌) 54-40, 56-43, 49-28, दिनेश मेहतानी (पूना क्‍लब) वि.वि. जयदीप मेहता (ठाणे) 54-23, 71-34, 76-26, सुनील जैन (मुंबई) वि.वि. दीक्षांत ननावरे (सातारा) 59-23, 61-16, 60-30, विवेक उंबरचंद (रॉयल क्‍लब) वि.वि. प्रतीक धुमाळ (निगडी) 51-31, 58-18, 71-30, गौरव कासार (रॉयल क्‍लब) वि.वि. आर्य बापट (पुणे) 63-36, 70-37, 68-58, देवदत्त महाजन (अकोला) वि.वि. प्रतीक चव्हाण (क्‍यू क्‍लब) 36-23, 65-27, 62-14, कैवल्य चव्हाण (सातारा) वि.वि. विलास उपशाम (एल्फिस्टन) 71-44, 35-53, 49-56, 70-58, 61-36, साद सय्यद (क्‍यू क्‍लब) वि.वि. अद्वैत रांगणेकर (सातारा) 48-22, 46-39, 54-11, कृणाल वासवानी (पूना क्‍लब) वि.वि. अमित पराशर (क्‍यू क्‍लब) 21-53, 45-35, 30-45, 68-36, 45-43, वीरेन शर्मा (मध्यप्रदेश) वि.वि. गणेश वारघडे (पिंपरी) 60-43, 57-48, 65-10, कुमार शिंदे (पूना क्‍लब) वि.वि. अभिषेक पवार (टेबल्स्‌) 75-23, 60-31, 72-45.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button