breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समाजविघातक घटनांमुळे सरकारवरील लोकांचा विश्वास उडाला – अब्दुल गफ्फार मलिक

पिंपरी, (महा ई न्यूज) – देशात प्रचंड महागाई वाढली आहे, भ्रष्टाचार, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, चूकीचे कामगार धोरण, शेतकरी आत्महत्या, शेतीला हमीभाव नाही, खून अशा विविध घटनांमुळे या सत्ताधारी पक्षावरून लोकांचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील एका खासगी हॉटेलमध्ये गुरूवारी (दि. ४) दुपारी साडेतीन वाजता अल्पसंख्याक समाजाची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, सोहेल खान, शमीम पठाण, विठ्ठल काटे, जगदीश शेट्टी, फजल शेख, महंम्मद पानसरे, प्रसाद शेट्टी, जावेद शेख, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, अरूण बोऱ्हाडे, विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे, वर्षा जगताप, कविता खराडे, विश्रांती पाडाळे, विनोद कांबळे, दिपक साकोरे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, मौलाना अब्दुल गफ्फार, लालमोहम्मंद चौधरी, इम्रान शेख, पांडुरंग लांखडे, प्रदिप गायकवाड, शक्रुल्ला पठाण, अशोक कुंभार, सुलेमान शेख, महेश झपके, प्रविण गव्हाणे, उत्तम हिरवे, रशिद सय्यद, दत्तात्रय जगताप, मेघा पवार, यतिन पारेख इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच अल्पसंख्याक (मुस्ल‍िम) समाजाच्या बाजूने बारीक विचार करून, त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेत आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये देखील या समाजाला सामावून घेत आहेत, तसेच समाजातील तरूण-तरूणी या शिक्षणात, उद्योगधंद्यात, नोकरीत कसे पुढे जाईल, यांचा विचार व अमंलबाजवणीसाठी पक्ष नेहमीच आग्रही भूमिका घेत आहे.

देशातील व राज्यातील भाजपा सरकार हे अल्पसंख्याक समाजाला नेहमीच दुय्यम वागणूक देण्याचे काम करीत आहे. हिंदु-मुस्ल‍िम वाद पेटवण्याचे षडयंत्र काही जातीयवादी लोक करीत आहे, त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला हा फार मोठा धोका असून, भाजपा सत्ताधारी यांच्या काळात संविधानाच्या प्रती जाळल्या जातात, तरी देखील हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे आपला देश हा हुकूमशाही पध्दतीने चाललेला आहे का? असा प्रश्न पडला आहे. या देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी २०१९ ला जातीयवादी पक्षांना दूर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचे आवाहन मलिक यांनी केले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button