breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समस्येची तक्रार केली म्हणून आयुक्तांचे उपमहापौरांच्या विरोधात सुडाचे कारस्तान

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आरोप
  • सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

पिंपरी, (महाईन्यूज) – प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याशी संपर्क साधला होता. परंतु, आयुक्तांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता. या कारणावरून उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी मागच्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांना जाब विचारला होता. त्यानंतर प्रशासनाने उपमहापौर चिंचवडे यांच्या नातेवाईकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सुडबुध्दीतून आयुक्तांनी ही कारवाई केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. हिम्मत असेल तर शहरातील सरसकट अवैध बांधकामांवर कारवाई करून दाखवा, असे आव्हान साने यांनी आयुक्तांना आज सभागृहात दिले.

  • महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आजची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियानच्या विषयावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर निशाना साधला. आरोग्याच्या विषयावरून प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील आरोग्याशी निगडीत समस्या मांडल्या. आरोग्य विभागाकडून वेळेवर कचरा उचलला जात नाही. गाड्या वेळेवर येत नाहीत. सार्वजनिक स्वच्छता गृहे दुर्गंधीच्या विळख्यात सापडली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक पाहणी करत नसल्यामुळे ठेकेदार वेळेवर काम करत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, माझ्या प्रभागातील मुता-यांची दुरवस्था झाली आहे. वेळेवर स्वच्छता होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ऐन पावसाळ्यात अशी अवस्था असेल तर नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. याकडे आरोग्य विभागाचे बिलकूल लक्ष नाही. कचरा वेळेवर उचलला जात नाही. साफसफाई होत नाही, या प्रश्नांसाठी आयुक्तांनाच फोन करावा लागेल का?. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. त्यांना जबाबदारीचे भान नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शरदनगर, भीमशक्तीनगर याठिकाणी सार्वजनिक स्वच्छता गृहांची दैनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागते. ही परिस्थिती बदलायची असेल तर पालिकेने नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

  • प्रभागातील नागरिकांच्या समस्यांमुळे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आयुक्तांना लक्ष केले होते. त्यावरून साने म्हणाले की, उपमहापौर चिंचवडे यांनी मागच्या सभेत आयुक्तांना थेट जाब विचारला होता. त्यामुळे आयुक्तांनी प्रशासकीय अधिकाराचा वापर करत चिंचवडे यांच्या नातेवाईकांच्या अनधिकृत पत्राशेडवर कारवाई केली. आयुक्तांनी ही कारवाई सुडबुध्दीने केल्याचा आरोप साने यांनी केला आहे. अवैध बांधकामांवर कारवाईच करायची असेल तर शहरात ढिगभर अशी बांधकामे झाली आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, असेही साने यांनी म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button