breaking-newsमनोरंजन

सनी पुन्हा संतोषींबरोबर

सनी देओल या अभिनेत्याचा एके काळी सिनेसृष्टीवर दबदबा होता. बॉलीवूडमधल्या आघाडीच्या- सुपरस्टार नावांमध्ये त्याची गणना केली गेली नसली तरी आपल्या रांगड्या आणि आक्रमक भूमिकेमुळे त्याने नव्वदीच्या दशकात स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला होता. आजही सिनेवाहिन्यांवरील त्याचे चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दामिनी, घायल, घातक, गदर- एक प्रेमकथा, बॉर्डर, जिद्दी, सलाखे आदी चित्रपटांमधून सनी देओलने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नायकाच्या व्यक्‍तिरेखा मोठ्या ताकदीने साकारल्या. पण अलीकडील काळात सनीचे चित्रपट तिकिट खिडकीवर सपाटून आपटत चालले आहेत. त्यामुळे आता त्याने आपला फेवरिट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दामिनी, घायल, घातक यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन राजकुमार संतोषींनी केलेले आहे. आता आगामी “फतेह सिंह’ या चित्रपटातून ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद कुरेशी यांनी केली आहे. यापूर्वी कुरेशी यांनी अभय देओलच्या “नानू की जानू’ आणि गोविंदाच्या “फ्रायडे’ या चित्रपटांची निर्मिती केलेली होती. “फतेह सिंह’साठी आधी अजय देवगणच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण अजयने नकार दिल्यामुळे सनी देओलच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. हा एक जबरदस्त अॅक्‍शनपट आहे. आता सनीचा “ढाई किलो का हाथ’ या चित्रपटातून काय करिष्मा दाखवतो हे पहावे लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button