breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सत्तेसाठी लाचार जीने आम्हाला पसंत नाही’, मारुती भापकर यांची शिवसेनेवर जहरी टिका

  • पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा
  • राजीनाम्यातून साधला पक्षावर निशाना

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जम्मु-काश्मिर येथील पुलवामा आंतकवादी हल्ल्यात भारतीय जवानांना वीर मरण आले. सारा देश शोकसागरात बुडालेला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर आले. मिष्टाण्ण पदार्थांवर ताव मारत युतीची डाळ शिजवली. हे निषेधार्ह आणि धक्कादायक आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली. आपण महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढले आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकत्यांची विनाकारण गळचेपी होत आहे. सार्वजनिक जीवनात असे लाजीरवाणे आणि कोडगे जिने आम्ही जगू शकत नाही. जिगडे भेळ तिकडे खेळ हे आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शिवसेनेवर टिका करत शिवसेनेचा राजीनामा दिला.

१९८२-८३ सामाजिक, राजकीय कामाची सुरवात शिवसेना पक्षातुन केली.  १९९६ पर्यंत मी शिवसेनेत सक्रिय होतो. या काळात लोकसभा विधानसभा, महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी निस्वार्थी काम केले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा ध्वज फडकविण्याचे स्वप्न साकार होण्यासाठी १९९५ विधानसभा निवडणुकीत रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करुन हवेली विधानसभेवर त्यावेळचे शिवसेना उमेदवार गजानन बाबर यांना निवडुण आणण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना भाजपाची सत्ता आल्यांनतर पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या स्थानिक कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्षातून बाजुला झालो. २०१७ महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला. मला शिवसेनेने काळभोरनगर प्रभाग क्र. १४ मधून उमेदवारी दिली. त्यात मी प्रमाणिकपणे शिवसेनेच्या इतर तीन उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, शिवसेना नेत्यांनी षडयंत्र रचून माझा निसटता पराभव घडवून आणला, असा आरोप भापकर यांनी केला आहे.

मागील दोन वर्षापासून महापालिकेत सत्ताधारी  भाजपाच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या विरोधात कायम संघर्षाची भूमिका घेऊन मी लढत आहे. शहरात वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असताना अनियमित बांधकामे शास्ती कर शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव कर्जमाफी या विषयाबाबत आंदोलन करीत असताना. हे भापकरांचे वैयक्तीक आंदोलन आहे. शिवसेनेचा त्याच्याशी काडीचा संबंध नाही, असे म्हणून शहर शिवसेनेने अलिप्त राहणे पसंत केले, अशीही नाराजी भापकर यांनी नमूद केली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणाबाबत देशभर असंतोष आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक, महागाईमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे केंद्रातील हे जुलमी सरकार पदच्युद व्हावे, अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे. मात्र, ऐकमेकाविरुध्द येवढ्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या असताना पुन्हा गळ्यात गळा घालणे. हे सरळ-सरळ जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रकार आहे. कार्यकर्ते शेळ्या मेंढ्या नसून त्यांनाही इश्वरांने बुद्धी दिलेली आहे. त्यामुळेच मी शिवसेना या पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असे भापकर यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button