breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

सरकारला शिवसैनिकांचा घरचा आहेर ; पिंपरीत शिवसेनेचा पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सायकल मोर्चा

पिंपरी – एकीकडे केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या एनडीए सरकारमध्ये सहभागी होवून शिवसेना सत्तेची चव चाखत आहे. राज्यातही भाजप-शिवसेनेच्या युतीचे सरकार आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्ये पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आज (बुधवारी दि.३०) सायकल मोर्चा काढण्यात आला. भाजप-शिवसेना सत्तेत असलेल्या सरकार विरोधात घोषणाबाजी करीत सतत होणा-या पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध शिवसैनिकांनी केला. एकंदरित शिवसैनिकांनी आपल्याच युती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मोरवाडी चौकातील अहिल्या होळकर मेघडंबरीपासून सायकल मोर्चाला सुरुवात करुन पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्क प्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका आश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक संपत पवार, अनंत को-हाळे, पिंपरी विधानसभा समन्वयक माधव मुळे यांच्यासह आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button