breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधा-यांची पालिकेत “दादा”गिरी; सोप्यांचा रंगही अर्ध”केशरी-हिरवा”

  • पक्षाचा अजेंडा राबविण्याचा खटाटोप
  • प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोव-यात

 

पिंपरी – गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असल्याने स्थानिक भाजपच्या पदाधिका-यांची महापालिकेत दादागिरी सुरू आहे. अधिका-यांवर दबाव आणून वाट्टेल त्या पध्दतीने कायदा दामटण्याची पध्दत अवलंबली जात आहे. नगरसेवकांच्या प्रभागातील नावांच्या पाट्यांपासून ते आता पदाधिका-यांच्या कार्यालयातील सोप्यांचा रंग बदलण्यापर्यंत पक्षाचा अजेंडा राबविला जात आहे. पालिकेतील पक्षनेत्यासाठी खरेदी केलेल्या सोप्यांचा रंग देखील चक्क अर्ध केशरी-हिरवा आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हे पालिका भवन नसून भाजपचे मुख्यालय भासू लागले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कामाला वैतागून नागरिकांनी भाजपच्या हातात शहराच्या विकासाची सुत्रे मोठ्या आशेने सोपविली. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना पक्षाच्या स्थानिक पदाधिका-यांकडून खूप आपेक्षा आहेत. मात्र, दोन्ही सरकारने आश्वासनांच्या पलिकडे नागरिकांना काहीही दिले नाही. आता पालिकेतील पदाधिकारी देखील तोच कित्ता गिरवत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांना कमी महत्व देऊन आपली कार्यालयीन बडदास्त वाढविण्याला प्राधान्य दिले आहे. पदाधिका-यांच्या केबिनची शोभा वाढविण्यासाठी चक्क केशरी आणि हिरवा रंग असलेले सोपे खरेदी करण्यात आले आहेत.

 

महापालिकेतील तिस-या मजल्यावर महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते, उपमहापौर, पक्षनेते, काही समित्या आणि गटनेत्यांची कार्यालये आहेत. यातील पक्षनेत्याच्या केबिनमधील सोपे बदलण्यात आले आहेत. पूर्वीचे सोपे काढून त्याठिकाणी भाजपचे निशाण असलेले सोपे ठेवले जात आहेत. या सोप्यांचा रंग देखील भाजपच्या झेंड्याप्रमाणे अर्ध केशरी-हिरवा आहे. या सोप्यांमुळे कार्यालयाचा लुक चेंज होणार आहे. हे पालिकेतील पक्षनेत्याचे कार्यालय नसून भाजपचे मुख्यालय असा भास होऊ लागला आहे. एवढेच नव्हे तर प्रभागांमध्ये नगरसेवकांची जनसंपर्क कार्यालये तसेच निवास स्थानाकडे जाण्याचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. या फलकांचा रंग देखील भाजप पदाधिका-यांनी प्रशासनावर दबाव आणून पक्षाला साजेसा अर्ध केशरी-हिरवा ठेवला आहे.

 

भाजप पदाधिका-यांचा प्रशासनावर दबाव?
महापालिकेत लागणा-या काही वस्तुंची खरेदी भांडार विभागातर्फे केली जाते. सोपे प्रशासनातर्फे खरेदी केले असतली तर त्याचा रंग ठरविण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची असते. मात्र, या सोप्यांचा रंग अर्ध केशरी-हिरवा ठरविण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी प्रशासनावर दबाव आणला की काय, असा प्रश्न महापालिकेत नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button