breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सचिन अंदुरेच्या मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल जप्त; या पिस्तुलानेच दाभोलकरांची हत्या

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नेरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याच्या औरंगाबादेतील मित्राकडून ७.६५ बोअरचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. या पिस्तुलाद्वारेच दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय सीबीआय आणि एटीएस या तपास पथकांनी व्यक्त केला आहे.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने औरंगाबादमधून सचिन अंदुरेच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली असून तिघांच्या घरातून काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात  आले आहे. यामध्ये या पिस्तुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी शनिवारी शरद कळसकर (वय २९) आणि सचिन अंदुरे या दोघांना अटक केली होती. राज्याच्या एटीएसने ही कारवाई केली होती. सचिन अंदुरेची कसून चौकशी केल्यानंतर मंगळवारी पहाटे पोलिसांच्या पथकाने औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेच्या तीन मित्रांच्या घराची झाडाझडती घेतली. यातील एकाच्या घरात पोलिसांना हत्यारे सापडली. तर अन्य दोघांच्या घरातून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचे साहित्य जप्त करण्यात आले. औरंगाबादमधील पैठण रोड येथे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

दरम्यान, तपास पथकांनी या प्रकरणी महाराष्ट्राबाहेरील ठिकाणांचीही पाहणी केली आहे. याप्रकरणी ज्या संशयीतांच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही तपास पथकाच्या चौकशीत समोर आले आहे.

या संपूर्ण चौकशीदरम्यान सुरुवातीला या शस्त्रसाठ्याचा वापर मराठा मोर्चात घातपातासाठी असल्याचा संशय तपास पथकांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मराठा मोर्चासाठी या हत्यारांची जमवाजमव केल्याची माहिती अद्यापपर्यंतच्या तपासातून स्पष्टपणे पुढे आलेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button