breaking-newsमनोरंजन

सईने ट्विट केले ‘अश्लिल चाळे’ ; आणि ‘निळू फुले’ म्हणतात

‘मी टू’ सारख्या मोहीमेवर अगदी खुलेपणानं बोलणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर पुन्हा एकदा टीकेची धनी ठरली आहे. आलोक राजवाडे यांचा ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ हा चित्रपट लवकरच येत आहे. मुंबई फिल्म फेस्टीव्हल २०१८ साठी निवड झालेल्या या चित्रपटाचं पहिलं वहिलं पोस्टर सईनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलं, मात्र एकीकडे तू ‘मी टू’ मोहिमेला पाठिंबा देते आणि दुसरीकडे तू अशा चित्रपटाची जाहिरातबाजी करते याला काय अर्थ आहे? असं म्हणत ट्विटरवर अनेकांनी तिच्यावर टिका केली आहे.

यातील एक प्रतिक्रिया सईनं रिट्विट केली आहे. ट्विटरवरील ‘निळू फुले’ या अकाऊंटवरून आलेली प्रतिक्रिया सईनं रिट्विट केली आहे. ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ सारखे चित्रपट तयार करायचे, समाजामध्ये वाईट पसरवायचं मग आहेच मी टू सारख्या गोष्टी’ अशी प्रतिक्रिया या ट्विटमध्ये होती. मात्र या प्रतिक्रियेवर काहीही व्यक्त न होता सईनं ती शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया शेअर करताना सईनं फक्त हसण्याचे स्माईली ठेवले आहे.

‘अश्लिल चाळे’ या चित्रपटाचं नेमकं कथानक काय आहे हे अजूनही उलगडायचं आहे. मात्र नावावरून अनेकांनी मत तयार करत सईला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. यापूर्वीही मी टू मोहिमेला पाठिंबा दर्शवणाऱ्या सईला ट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र सईनं त्यावेळी सर्वांनाच सडेतोड उत्तर दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button