breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतप्त बांधकाम मजुरांचा पुण्यातील कामगार कार्यालयात ठिय्या

पिंपरी, (महाईन्यूज) – बांधकाम मजुरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, बोगस नोंदणी रद्द झाली पाहिजे, अपघातात मुत्यु पावलेल्या बांधकाम मजुरांच्या वारसदारांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, धोकेदायक बांधकाम साईट त्वरित बंद झाल्या पाहिजेत. यासह ईतर विविध मागण्यांसाठी संतप्त बांधकाम मजुरांनी पुणे शिवाजीनगर येथील कामगार कार्यलयाबाहेर ठिय्या मांडला. यावेळी संतप्त कामगारांनी कार्यालयाचे कामकाज बंद पाडून आंदोलन केले.

साहायक कामगार आयुक्त पनवेलकर साहेब यांच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले दुपारी 1 ते 3 असा दोन तास आंदोलक  कार्यालयात ठिय्या मांडुन बसले होते. कष्टकरी कामगार पंचायत वतीने हे आंदोलन करण्यात आले. पंचायत अध्यक्ष कष्टक-र्यांचे नेते बाबा कांबळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी योगिता शिंदे, आशा कांबळे, प्रीती रोडे, अनिसाबी खाटीक, अप्सर शेख, अंजुबाई रोठोड, अविदा वाळुंजकर, विद्या गंज, मंजुळा कांबळे, मंगल शेरे, लालचंद पवार, मुक्तीराम जावळे, रोहित गायकवाड, अनिता गोरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने बांधकाम मजुरांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून या मंडळात सात हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. पुणे येथे भिंत पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २५ कामगारांचा मृत्यू झाला. पिंपरी येथे शासनाची योजना असलेल्या म्हाडाच्या साइटवर  एका अपघात होऊन एका कामगारांचा मृत्यू झाला. दोन कामगार गंभीर जखमी आहेत. अशाप्रकारे सर्रासपणे बांधकाम मजुरांचे अपघात होत असून ज्या बांधकाम मजुरांचे अपघात झाले आहेत. त्यांची मात्र बांधकाम कामगारांमध्ये नोंदणी असल्याचे दिसून येत नाही. यामुळे या बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. तसेच, शासनानी 29 कल्याणकारी योजना जाहीर केल्या असुन नोंदणीकृत कामगारांस या योजनेचा लाभ दिला जात आहे.

परंतु, प्रत्यक्ष मात्र, खऱ्या बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याऐवजी संबधित अधिकारी यांनी संगतमत करून बोगस लाभार्थीची नोंदणी केली आहे. प्रत्यक्ष बांधकाम करणारे खरे मजूर मात्र, या योजनेपासून वंचित आहेत. ख-या लाभार्थींची नोंदणी करण्यात यावी. नोंदणी पद्धत आणि लाभ देण्याची प्रकिया सुलभ करावी. यासाठी संघटनेच्या पदाधिकारी यांनी कार्यालयातील संबधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आहे. संबधित अधिका-याने उडवाउडवीची उत्तरे देत बांधकाम योजनेचा लाभ देण्यासाठी पैशाची मागणी केली. यामुळे संतप्त मजुरांनी या बाबत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या कडे तक्रार केली असता बाबा कांबळे यांनी तातडीने कामगार कार्यालयात धाव घेऊन मजुरांसोबत ठिय्या आंदोलन केले.

बांधकाम मजुरांचे प्रश्न न सुटल्यास यापेक्षा तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा बाबा कांबळे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button