breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संततधार पावसाने रावेत बंधारा अोसडूंन वाहतोय ; शहरातील अनेक झोपड्यात शिरले पाणी

पिंपरी –  पिंपरी चिंचवड शहरात सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पाऊसाने रावेत येथील बंधारा आेसंडून वाहू लागला आहे.  तसेच चिंचवडच्या मोरया गोसावी मंदिरातही गुडघाभर पाणी शिरले आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पवना नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

निगडीच्या सेक्टर 22 येथील संग्रामनगर, राजनगर परिसरातील सुमारे 105 झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. महापालिकेतर्फे येथील टपरी जेसीबीने उचलण्यात आली. तसेच,  गटार फोडून पाणी वाहून जाण्याची सोय करण्यात आली. चिखली येथील घरकुल सोसायटीतील शेवटच्या इमारतीत पार्किंगमध्ये पावसाचे पाणी शिरले होते.

मुळानगर (सांगवी) येथील 25 ते 30 झोपड्यांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले होते. त्याशिवाय, पिंपरी- संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामागे असलेल्या महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत नाल्याचे पाणी शिरले होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी पाहणी केली. तसेच, तातडीने आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या.

दरम्यान, शहरातील विविध सखल भागांमध्ये आणि रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पुनावळे, प्राधिकरण-वाल्हेकरवाडी येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने वाहनचालकांची गैरसोय झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले. प्राधिकरणातील आशीर्वाद कॉलनी, सिद्धिविनायक नगरी परिसरामध्ये काही नागरिकांच्या घरात सांडपाणी नलिकेचे पाणी शिरले. रावेत-भोंडवे कॉर्नर येथे रस्त्यावर पाणी साचले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button