breaking-newsपिंपरी / चिंचवड

संगिता जोगदंड राज्यस्तरीय “मानवधिकार” पुरस्काराने सन्मानित

पिंपरी ( महा ई न्यूज ) – जागतिक मानवधिकार दिनानिमित्त पूणे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात नवी सांगवीतील मानवधिकार कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना माजी कुलगुरू डॉ ए.डी.सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  यावेळी अॅंड, असीम सऱोदे, सुभाष वारे उपस्थित होते.
यावेळी जोगदंड म्हणाल्या की, विविध सामाजिक कार्यात सक्रीय आहे. समाजात जनजागृती, पटनाटय, व वंचितांसाठी काम केले. या कामाची दखल या संस्थेने घेऊन मला  हा पुरस्कार प्रदान केला. याचा मला आनंद तर झाला. यापूढेही मी आधिक जोमाने कार्य करत राहील. माझे पती आण्णा ज़ोगदंड यांच्या सामाजिक कामामुळेच मला घरातुन प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी सांगितले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास हार घालून प्रत्येक जिल्ह्यास्तरावर “विशेष मानवी हक्क न्यायालय,”असावे अशी शासनाने  30 मे 2001 मध्ये कायद्यात तूरतुर केली आहे .परंतु 17 वर्षांत अमंलबजावणी झालेले नाही म्हणून रँली काढून जिल्ह्याधिकारी यांना निवेदन दिले, असे संचालक आण्णा जोगदंड यांनी सांगितले. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार संगिता जोगदंड, कतारसिंग (पंजाब), सूमनताई जाबुळकर, पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे (राष्ट्रपती पुरस्कारार्थी, सातारा), सुनील सवाशे, (पत्रकारिता), डॉ आभिषेक हरीदास (शैक्षणिक) आदींना गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास,कुचेकर, राष्ट्रीय सचिन सोमनाथ सावंत, संचालक आन्ना जोगदंड, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष सतिश लालबिगे, महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार अध्यक्ष अँड सचिन झालटे, मुख्य सल्लागार आनिल कदम, पुणे जिल्हा यूवक अध्यक्ष धनरासिंग चौधरी, उपाध्यक्ष विकास शहाणे, महिला अध्यक्षा किर्ती जाधव गूलशन नायकुडे ,संघटक सचिव गजानन धाराशीवकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महेश भागवत, एस डी विभुते,राजश्री गागरे, नियाज शेख ठाणे जिल्हा अध्यक्ष शकील शेख  आदी मान्यवर उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button