breaking-newsमनोरंजन

श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचे आगमन

अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस बाबा झाला. श्रेयस आणि दीप्ती यांच्या मुलीचा जन्म 4 मे रोजी झाला. सरोगसीच्या माध्यमातून तळपदे दाम्पत्याला पालकत्व मिळाले आहे. १४ वर्षांपूर्वी श्रेयस आणि दीप्ती विवाहबंधनात अडकले होते.

गेल्याच आठवड्यात श्रेयस आणि दीप्ती हाँगकाँगला सुट्टीसाठी गेले होते. 10 ते 20 मे दरम्यान बाळाचा जन्म होईल, अशी डेट डॉक्टरांनी दिल्यामुळे तळपदे परदेशी गेले होते. सरोगेट मदरला अचानक प्रसुतिकळा सुरु झाल्याचे समजताच दोघे  मुंबईला येण्यास निघाले. विमान प्रवासात असतानाच बाळाचा जन्म झाल्याची गोड बातमी त्यांना समजली. बाळाचे  नाव काय ठेवायचे, याबाबत श्रेयस विचार करत आहे. सरोगसीच्या माध्यमातून पालक होणे, हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचं श्रेयसने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button