breaking-newsक्रिडा

शेवटच्या चेंडूवर विजय, भारताने आशिया चषक जिंकला!!!

दुबई– येथे  सुरु असलेल्या आशिया चषकाच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला नमवत आशिया चषकावर पुन्हा आले नाव कोरले.  शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला. विजयी फटका केदार जाधावने मारला. हा अंतिम सामना हरल्यामुळे बांगलादेशचे आशिया चषक जिंकण्याचे स्वप्न तिसऱ्यांदा भंगले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारताने गोलनंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय सुरुवातीला चांगलाच अंगलट आला. बांगलादेशचे सलामीवीर खेळपट्टीवर तग धरून  फलंदाजी केली. त्यांनी शतकीय सलामी दिली. भारताला पहिले यश बांगलादेशचे  २० षटकांच्यानंतर मिळाले. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाज नियमात अंतराने बाद होत गेले. सलामीवीर लिटोन दास याने आपले शतक पूर्ण करत बांगलादेशला २२२ धावांचा टप्पा गाठून दिला.

विजयासाठी माफक २२३ लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन(१५) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला आंबाती रायडू(२) हे स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघावर दडपण वाढले. त्यानंतर नियमित अंतराने भारतीय  खेळाडू बाद होत गेले.  रोहित शर्मा, दिनेश कार्तीक, महेंद्रा सिंग धोनी यांना चांगली सुरुवात मिळाली पण ते मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.

४५च्या षटकात भारताची धावसंख्या १९७/ ५ अशी होती. भारताला विजयासाठी २६ धावांची गरज होती. त्यात भारताचे सर्व दिग्ग्ज फलंदाज बाद झाले होते तर केदार जाधवला हॅमस्ट्रिंग झाल्याने तो मैदानाबाहेर गेला होता.  त्यानंतर भुवनेश्वर कुमार फलंदाजीस आला त्याने एक षटकार खेचून भारतीयांना विजयाचे जवळ नेले. त्यानंतर जडेजा आणि भुवनेश्वर कुमार हे बाद झाले. मैदानात परत आलेल्या केदार जाधव आणि कुलदीप जोडीला शेवटच्या षटकात ६ चेंडूंमध्ये ६ धावा काढायच्या होत्या. त्यांनी ते शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले. भारताने हा अंतिम सामना जिंकत आशिया चषकावर नाव कोरले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button