breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

शिवसेनेला विधानसभेसाठी हव्यात १५२ जागा

मुंबई:  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत बंद दाराआड झालेल्या दोन तासांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी शहा यांच्याकडे राज्यात विधानसभेच्या १५२ जागा मागितल्याचे सांगण्यात येते. १५२ जागा लढवून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच करण्याची यामागची उद्धव ठाकरे यांची खेळी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘संपर्क फॉर समर्थन’ अभियानाच्या निमित्ताने अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी ठाकरे-शहा या दोघांमध्येच दोन तास चर्चा झाली. या चर्चेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दूर ठेवण्यात आले होते. या बैठकीत युतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत उद्धव यांनी शहा यांच्याकडे थेट विधानसभेच्या १५२ जागा मागितल्या. मात्र शहा यांनी या प्रस्तावावर लवकरच चर्चा करण्याचे आश्वासन उद्धव यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत बोलताना शिवसेनेचा एक नेता म्हणाला की, ‘जर भाजप केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास महाराष्ट्रातील जनतेचा कल भाजपच्या बाजूने जाईल. त्यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे शिवसेनेला कठिण जाईल. तसे झाल्यास ही आमची घोडचूक ठरेल.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button