breaking-newsमहाराष्ट्र

शिवसेना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांना अटक

औरंगाबाद : औरंगाबादमधील हिंसाचारात सहभागी असणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सोडावे, अशी मागणी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख व माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांती चौक पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांना धमकावत टेबलावर काच फोडली. खुर्च्याची फेकाफेक केली आणि सीसीटीव्ही कॅमेराही तोडला. या प्रकरणी वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैस्वाल यांना सोमवारी दुपारी अटक करण्यात आले.

प्रदीप जैस्वाल यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजीही सुरू होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button