breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिवसेना-भाजपला थोपविण्यासाठी पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी द्या – मयुर कलाटे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून युवा नेते पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली आहे. याबाबत लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन पार्थ यांना उमेदवारीसाठी आग्रह धरणार आहेत.  

मयुर कलाटे यांना दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, देशात लोकसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी आपआपल्या संभाव्य उमेदवारांना तयारी करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. सर्वच पक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारीस लागलेले आहेत. मावळ लोकसभेमधून पार्थ पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधून लोकसभेसाठी तयारी चालू केली होती. त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी मावळातील वडगाव, तळेगाव, पिंपरी चिंचवड या भागात दौरे काढून मावळ लोकसभेच्या मतदार संघाची माहिती व नागरीकांची मते जाणून घेतली आहेत. त्यामध्ये पार्थ पवार यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचारांची ताकत अधिक आहे. आजवर मतांची विभागणी आणि बंडखोरी झाल्याने अपयश आले आहे. भाजप व शिवसेनाला या मतदारसंघात थोपवायचे असेल तर पार्थच योग्य उमेदवार असणार आहेत. पार्थ यांनी मावळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. तसेच इतर पक्षांचीही मदत मिळेल.

त्यामुळे आम्ही सर्व पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसदस्य पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यानांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात यावी. याबाबत लवकरच शरद पवार यांची वेळ घेऊन त्यांनी अशी सर्वजण एकमुखी मागणी करणार आहोत असे मयुर कलाटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button