breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचा मावळातून पराभव अटळ?  

  • भाजपच्या निष्ठावंतांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले पत्र
  • भाजप नगरसेवक, पदाधिका-यांसह पन्नासजणांनी दिले आव्हान

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजप-शिवसेना युतीची संभावना असताच मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपतील निष्ठावंतांची फौज उभी ठाकली आहे. युती झाल्यास मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार आम्हाला चालणार नाहीत. खासदार बारणे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उमेदवार शिवसेनेने द्यावा. अन्यथा शिवसेनेच्या तिकीटावर खासदार बारणे पुन्हा उभे राहिल्यास त्यांचा पराभव अटळ समजावा, असा निर्धार पिंपरी-चिंचवड भाजपच्या निष्ठावंत नगरेसवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.

यासंदर्भात भाजपच्या स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना स्वहस्ते पत्र दिले आहे. ते पत्र मंत्री गडकरी यांनी सुखद मनाने स्वीकारले आहे. याचा अर्थ काय काढायचा असा प्रश्न बारणे समर्थकांना पडला तर नवल नसावे. पत्रात म्हटले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता आहे. युतीबाबत शहर भाजपतील कार्यकर्त्यांची हरकत नाही. परंतु, मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचे काम आजवर केलेले नाही. पाच वर्षात त्यांनी भाजप सरकारवर टिकाच केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही.

स्थानिक पातळीवर खासदार बारणे यांना कोणताही त्रास नव्हता. तरीही, त्यांनी गेल्या पाच वर्षात भाजप नेते, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर टिका करून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. बारणे यांना त्यांचे चार नगरसेवक देखील निवडून आणता आले नाहीत. भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांचे काम आगामी लोकसभा निवडणुकीत करायला तयार नाही, असेही पत्रात नमूद आहे.

बारणे सोडून दुसरा कोणताही उमेदवार चालेल

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होईल. मावळ मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला जाईल. तेथून बारणे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उमेदवार देण्यात यावा. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते त्याचे जोमाने काम करेल. जर, बारणे यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली. तर खासदार बारणे यांचा पराभव अटळ समजावा, असेही आव्हान भाजप कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिले आहे. मंत्री गडकरी यांना दिलेल्या पत्रावर माजी उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, विजय शिंदे, शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवने अशा पन्नास कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button