breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवप्रेमी तरुणाने हिंजवडीत साकारली ‘किल्ले प्रतापगडा’ची प्रतिकृती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ले प्रतापगड हा आता पुण्यातील हिंजवडीत देखील पाहायला मिळणार आहे. शिवप्रेमी असणा-या धनंजय बर्वे यांनी तब्बल 17 लाख रुपये खर्च करुन प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. आयटी पार्क म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीमध्ये शिवप्रेमी तरुणाने किल्ले प्रतापगडाची हुबेहुब प्रतिकृती पाहाण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांची प्रचंड गर्दी होवू लागली आहे.

पिंपरी चिंचवड शहराजवळील आयटी नगरी म्हणून देशात हिंजवडीचं नाव प्रसिध्द आहे. आयटी नगरीमध्ये जगभरातील इंजिनियर कामानिमित्त येतात असतात. त्या आयटी नगरीत प्रतापगडाची प्रतिकृतीही त्याच्या लौकिकाला साजेशी अशीच आहे. सुमारे अडीच एकरात प्रतापगडची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा किल्ला उभारण्यासाठी 16 ते 17 लाख रुपये खर्च आला आहे.  त्या सर्वांना छत्रपती शिवरायांचं कौशल्य, त्यांचा पराक्रम, त्यांचा इतिहास माहित व्हावा, या उद्देशाने शिवप्रेमी धनंजय बर्वे यांनी हा भलामोठा प्रतापगड उभारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button