breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिराळा तालुक्यामध्ये ७ ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने मारली बाजी

शिराळा, दि. २९ (प्रतिनिधी)- शिराळा तालुक्यामध्ये झालेल्या २७ ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक १० ग्रामपंचायतीवरती सरपंच पदाचा झेंडा फडकविला आहे. तालुक्यातील पणुंब्रे वारुण, शिरशी, मराठेवाडी, करुंगली या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायती मिळविल्या आहेत. तर राष्ट्रवादीस ८, तर भाजपला ६ ठिकाणी यश मिळाले, १ ग्रामपंचायत मनसेने कायम राखली आहे. २७ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी  पार पडली.

कॉंग्रेसने सरपंच पदासह सत्ता मिळविलेल्या ग्रामपंचायती शिरशी, पणुंब्रे वारुण, करुंगली, मराठेवाडी, फकीरवाडी, चिखलवाडी, आंबेवाडी, मादळगांव, शिरसटवाडी, मोरेवाडी या ग्रामपंचायतीवरती कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. तर राष्ट्रवादी पक्षाला खराळे, अस्वलवाडी, इंग्रूळ, धसवाडी, रांजणवाडी, भाटशिरगांव, खुजगांव, पाचगणी अशा ८ ठिकाणी सरपंचपद मिळाले आहे. तसेच भाजप पक्षाला वाकुर्डे बुद्रुक, चिंचेवाडी, रिळे, कुसाईवाडी, कुसळेवाडी, मेणी अशा ६ या ठिकाणच्या ग्रामपंचायतीवर यश मिळाले. मनसेने सावंतवाडी ग्रामपंचायत कायम राखली असून बेलेवाडी, मानेवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची स्थिती त्रिशंकू अशी आहे. कॉंग्रेसने उत्तर व दक्षिण विभागामध्ये चांगलाच शिरकाव केला असून दक्षिण भागातील ४ पैकी २, फकीरवाडी, चिखलवाडी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे. तर उत्तर विभागातील ४ ग्रामपंचायतीपैकी शिरशी, मादळगांव, आंबेवाडी अशा ३ ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करत वर्चस्व सिद्ध केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button