breaking-newsक्रिडा

शिखर धवन दिल्ली डेअर डेव्हिल्स कडून खेळनार

हैदराबाद- भारताचा सलामीवीर आणि सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर शिखर धवन आयपीएलच्या आगामी सत्रात दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार असून दिल्ली आणि हैदराबादच्या संघांनी आपापल्या ट्‌विटर हॅंडलवर याची माहिती दिली आहे. सध्या शिखर टी-20 मधिल खराब फॉर्म मधून जात असला तरी त्याला त्याच्या खराब कामगिरीमुळे काढण्यात आले नसून तो आर्थिक कारणांमुळे हैदराबाद संघातून बाहेर पडला असल्याची माहिती यावेळी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

यावेळी बोलताना हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले की, शिखर धवन हा आर्थिक बाबींबद्दल समाधानी नव्हता. त्यामुळे त्याने दुसऱ्या संघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गत वर्षी झालेल्या ऑक्‍शनमध्ये हैदराबादच्या संघाने धवनला 5.2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र, धवन आपल्याला मिळालेल्या मानधनाबाबत खुश नव्हता. कारण, या पुर्वीच्या ऑक्‍शनमध्ये हैदराबादच्या संघाने तब्बल 12.5 करोड रुपयांच्या मानधनावर त्याला संघात सामील करुन घेतले होते. मात्र, हैदराबादच्या संघात वॉर्नर आणि केन विल्यम्ससारख्या खेलाडूंच्या उपस्थितीत धवनला नेतृत्वापासून दुर ठेवले गेले होते.

यावेळी हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने दिलेल्या कारणांमध्ये म्हंटले आहे की, आयपीएलच्या नियमांमध्ये रिटेन केलेल्या खेळादूंना जी किंमत देऊ केली आहे त्या पेक्षा त्याची किंमत वाढवण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यामुळे धवन गेल्या काही काळा पासून मानधनाच्या विषयावर नाराज होता. त्यामुळे त्याला आम्हाला दुसऱ्या संघाकडे सोपवावे लागत आहे. तो आमच्यासाठी खुप महत्वाचा खेळाडू होता त्यामुळे त्याला दुसऱ्या संघाकडे सोपवने हे आमच्या साठी कठीन काम होते.

शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली आहे. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात दिल्ली डेअरडेव्हिल्सने अधिकृत ट्‌विट केले आहे. धवनने आतापर्यंत 143 आयपीएल सामने खेळले असून त्यात 33.26 च्या सरासरीने आणि 123.53 च्या स्ट्राईक रेटने एकूण 4058 धावा केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button