breaking-newsराष्ट्रिय

शिक्षकाचा दुसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत पोहोचली घरी

आंध्र प्रदेशात 42 वर्षीय शिक्षकाने दुसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी ही घटना घडली. हैदराबादपासून 295 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णा जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकाने आठ वर्षाच्या चिमुरडीला एका रुममध्ये नेलं आणि बलात्कार केला.

बलात्कार झाल्यानंतर चिमुरडी रडत रडत घरी पोहोचली. यावेळी तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. आपल्याला वेदना होत असल्याची तक्रार तिने आईकडे केली. चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आईने मुलीला एका खासगी रुग्णालयात नेलं असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

यादरम्यान सतत होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉक्टरांना छोटी सर्जरी करावी लागली. आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पालक पोलीस तक्रार करण्यास घाबरत होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पालकांशी संपर्क साधत पोलिसांत तक्रार करण्यासाठी पटवलं.

आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री श्रीनिवास यांनी घटेनची दखल घेत तपास करण्याचे आणि संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. ‘आरोपी शिक्षकाला तात्काळ स्वरुपात निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेशही देण्यात आला आहे’, अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी एम व्ही राजलक्ष्मी यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button